HW News Marathi
देश / विदेश

लढाऊ विमानाला आग, विमानाचे तुकडे तुकडे झाले तरी पायलट बचावला

बहरिनः अमेरिकेच्या लढाऊ विमानाचे बहरिन विमानतळावर क्रॅश लॅँडींग करण्यात आले. विमानाच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्यानंतर वैमानिकाने बहरिन विमानतळावर विमान उतरवले. विमान उतरताना त्याचे काही भाग धावपट्टीला घासले व निखळून पडले होते. सुदैवाने यात कोणतीह जीवित हानी झाली नाही. मात्र, विमानाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान दुसऱ्या एका विमानाच्या मदतीने यातील पायलटला तत्काळ सुखरूप बाहेर काढण्यात आले. हवेत असताना इंजिनमध्ये बिघाड झाल्याने या विमानाला आग लागली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नवउद्योजकांच्या निर्मितीवरच त्यामुळे ‘घाव’ बसेल असे होऊ नये !

News Desk

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात ८ नक्षलवाद्यांचा खात्मा

News Desk

नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण अपघात; युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू

Aprna
मनोरंजन

ती एक प्रवाहिका.. काशीबाई कानिटकर

News Desk

उल्का चारुदत्त मोकासदार-

१८वे शतक हे स्त्री सुधारणा पर्व म्हणून ओळखले जाते. या काळात ज्या अनेक कार्ययोगिनी सामाजिक क्षेत्रात योगदान देत होत्या, त्यापैकी एक म्हणजे काशीबाई कानिटकर माहेरच्या बापट कुटुंबातून त्या ९ व्या वर्षी

काशीबाई कानिटकर

काशीबाई गोविंदराव कानिटकर झाल्या. सुधारक पती आणि कट्टर धार्मिक पारंपरिक सनातन सासर. अशा दुहेरी कात्रित गोविंदरावांच्या सहकार्याने त्या शिकु लागल्या. गोविंदरावांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या प्रार्थना समाजाच्या स्त्रियांच्या शाळेत शिक्षण सुरू झाले, खरेपण त्यात ही अनेक अडथळे. सुबोध पत्रिकेत त्यांनी लिहलेला ‘ पूर्वीच्या स्त्रिया व हल्लीच्या स्त्रिया’ हा लेख सदाशिवराव केळकरांनी छापून आणला आणि खर तर एका पहिल्या महिला स्तंभ लेखिकेचा तो उदय होता, असे म्हणल्यास वावगे ठरू नये. या काळात त्या हळूहळू लिहायला लागल्या. तिथूनच त्यांना डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या चरीत्र लेखनाचे वेध लागले. आणि त्यानी डॉक्टर आनंदीबाई यांच्या जीवन चरित्राचा सखोल अभ्यास करून त्यांच्यावरील पुस्तक प्रकाशित केले.एक उत्तम चरित्रकार म्हणून त्यांचे नाव इतिहासात अधोरेखित झाले आहे. त्यांच्या कार्याचे, अभ्यासशिलतेचे योगदान पाहून पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनच्या उद्घाटनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना बोलावले आणि सार्वजनिक कार्यक्रमातील पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून ही इतिहासात त्यांची नोंद आहे. तसेच राष्ट्रीय सभेस जाणारी पहिली हिंदुस्तानी स्त्री सुद्धा त्याच ठरतात. १९०९ साली झालेल्या वसंत व्याख्यान मालेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून ही त्यांचेकडे मान जातो. भरत महिला परिषदेत त्यांनी वाचलेला ‘ स्त्रीया आणि आर्थिक स्वातंत्र्य ‘ हा पेपर आज ही त्यांच्या अभ्यासुपणा आहे स्त्रीसुधारणावादी भूमिकेचे महत्व नमूद करतो. अशा बौद्धिक, अभ्यासू, व्यासंगी, चतुरस्त्र कार्ययोगीनीचा आज जन्मदिवस….

माझ्या सुदैवाने मला इतिहास संशोधक मंडळाच्या वाचनालयात त्यांचा दुर्मिळ फोटो मिळाला. आज या स्त्री सुधारणा पर्वातील या दिपस्तंभाला माझे मनोभावे वंदन आणि त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम

Related posts

‘नाळ’ची प्रेक्षकांना भुरळ, पहिल्याच आठवड्यात १४ कोटींची कमाई

News Desk

वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे यांचा पियानो फ़ॉर सेल ।

News Desk

आगमन बाप्पाचे | दिव्यांग मूर्तिकारावर बाप्पाचा वरदहस्त

News Desk