HW News Marathi
देश / विदेश

सौदीत दहा भारतीयांचा मृत्यू

वृत्तसंस्था- सौदी अरेबियात एका घराला लागलेल्या भीषण आगीत १० भारतीयांचा मृत्यू झाला. इतर सहा जण जखमी झाले आहेत. सौदीतील नजरान येथे ही घटना घडली. आगीत खाक झालेल्या घरात हे सर्व कामगार राहत होते. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या घटनेची माहिती ट्विटरवरून दिली.

सौदी अरेबियातील नजरान येथे एका घराला आग लागल्याची माहिती स्वराज यांनी दिली. मृत्युमुखी पडलेल्या एका कामगाराचा मृतदेह भारतात आणण्यासाठी स्वराज यांच्याकडे मदत मागितली आहे. नजरान जेद्दाह येथून ९०० किलोमीटरवर आहे. अधिकारी नजरान येथील गव्हर्नरांच्या संपर्कात आहेत. ते आपल्याला आगीच्या घटनेची क्षणाक्षणाची माहिती देत आहेत, असं स्वराज यांनी सांगितले. १० भारतीयांसह आणखी एक व्यक्ती यात मृत्युमुखी पडली आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. दक्षिण नजरानमधील एका घरात आग लागली असून त्यात राहणाऱ्या ११ कामगारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अरब न्यूजनं दिलं होतं. हे सर्व जण भारत आणि बांगलादेशातील आहेत. सौदी गॅजेटच्या वृत्तानुसार, सहा जखमींमध्ये ४ भारतीय आहेत. या घटनेची विस्तृत माहिती नसल्याचं रियाद येथील भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आलं. पीडित कामगार एका बांधकाम कंपनीत काम करत होते आणि फैसलिया जिल्ह्यात राहत होते. या घटनेच्या प्राथमिक चौकशीनंतर ही आग शॉर्ट सर्किटमुळं लागल्याचं सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BSNLचा ग्राहकांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’चा नवा प्लॅन

News Desk

हॉटेलच्या महिला कर्मचाऱ्यांची साडी उतरविण्या

News Desk

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये दाता दरबार दर्ग्याच्या बाहेर स्फोट, १८ हून अधिक जण जखमी

News Desk