HW News Marathi
देश / विदेश

सहा जणांचे प्राण वाचवण्यासाठी अंशी जणांनी घातला जीव धोक्यात

वृत्तसंस्थाः धकाधकीच्या आय़ुष्यात मणुष्य स्वार्थी झाला आहे. आपल्या भोवताली कोणी अडचणीत असेल तर त्याला वाचवणे सोडा, साधी मदत करण्याची माणुसकीही आपण दाखवत नाही. परंतु काही ठिकाणी अद्याप माणुसकी जीवंत असल्याचे दिसून येते. याचे उदाहरण म्हणजे फ्लोरिडा येथील एक घटना. समुद्रात लाटेसोबत वाहून जाणाऱ्या एका कुटुंबाला वाचवण्यासाठी तब्बल अंशी जणांनी जीव धोक्यात घातल्याचे पाहवयास मिळाले. जीवाचे रान करून या मित्रांनी त्या कुटुंबाला जीवदान दिले.

फ्लोरिडा येथील पनामा बिच सिटी परिसरात एक कुटुंब किनाऱ्याजवळ खेळत असताना लाटेबरोबर वाहून गेले. या कुटुंबात लहान मुले देखील होती. मदतीसाठी हे कुटुंब ओरडत होत. किनाऱ्यावर असणारे जीवरक्षक येऊन वाचवतील तोपर्यंत उशीर झाला असता तेव्हा किनाऱ्यावर असणाऱ्या एका महिलेने प्रसंगावधानता दाखवून मदतीची विनंती केली. बघता बघता काही मिनिटात किनाऱ्यावरच्या ८० जणांनी एक मानवी साखळी तयार केली. हळहळू ही साखळी समुद्रात शिरली आणि लाटांच्या जोरदार तडाख्यातही उत्तम समन्वय आणि हिंमत दाखवत या ८० जणांनी आपला जीव धोक्यात घालून समुद्रात बुडणाऱ्या कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दक्षिण भारतातून संपूर्ण चीन होऊ शकते उध्वस्त

News Desk

#Article370Abolished : सरकारचा ‘हा’ निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्याविरोधात !

News Desk

…भगतसिंग नास्तिक होते ?

News Desk