HW News Marathi
देश / विदेश

कोरोनाचा प्रकोप आता भारतीय लष्करापर्यंत, डॉक्टर आणि जेसीओ कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली | कोरोनाचा विळखा देशाला दिवसेंदिवस घट्ट आवळत आहे. सद्यस्थितीला देशात कोरोनाबाधितांचा आकडा ११४० वर पोहोचला आहे तर माहाराष्ट्रात ही संख्या २१५ झाली आहे. हा कोरोनाचा विळखा भारतीय लष्करापर्यंत पोहोचला आहे. भारतीय सैन्यदलातील कोलकाता स्थित कमांड रुग्णालयात कर्नल रॅंकचे डॉक्टर आणि डेहराडूनमधील जेसीओ यांना कारानाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही अधिकारी नुकतेच दिल्लीला जाऊन आले होते. त्यामूळे त्यांचा ज्या सैनिकांशी संपर्क झाला त्या सगळ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

या दोन्ही अधिकाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भारतीय सैन्यदलाने दिली आहे. कामानिमित्त दिल्लीला गेलेल्या या अधिकाऱ्यांनी भेट घेतलेल्या सिव्हील आणि मिलेटरी अधिकाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. याआधी भारतीय सैन्यात ३ जणांना लागण झाली होती. एका सैनिकाच्या वडिलाना लागण झाली होती आणि सुट्टीच्या निमित्ताने गावी गेल्याने त्या सैनिकालाही लागण झाली होती.

दरम्यान, मुंबई विमानतळावर सीआयएसएपच्या जवानालाही कोरोनाची लागण झाल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाले होते. सुरुवातीला सक्षणे आढळून ल्यानंतर त्याला क्वॉरंटाईन करण्यात आले होते. पण रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच त्यला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला, जनरल कासिम सुलेमानी ठार

News Desk

काबूलमध्ये भारतीय दुतावासाजवळ भीषण स्फोट, दोन ठार 90 जखमी

News Desk

राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे लोकसभेत गदारोळ

News Desk