नवी दिल्ली | तमिळनाडू येथील पुडुकोट्टईमध्ये रविवारी (२० जानेवारी) आयोजित करण्यात आलेल्या जलिकट्टू या पारंपरिक खेळादरम्यान २ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर या खेळात ३१ जण जखमी झाले आहेत. या खेळादरम्यान वळूने हल्ला चढविल्याने या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तमिळनाडूचे आरोग्य मंत्री विजयभास्कर यांनी या खेळाचे आयोजन केले होते.
#TamilNadu: Two people died during Jallikattu event in Puddukottai yesterday. (File pic) pic.twitter.com/tUnIQmnQq7
— ANI (@ANI) January 21, 2019
पुडुकोट्टईमध्ये झालेल्या या खेळात जवळपास १,३४५ वळू मैदानात उतरवून विश्वविक्रम रचला गेला. या खेळात जवळपास ४२४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. वर्ल्डकिंग्स वर्ल्ड रेकॉर्ड युनियनच्या माहितीनुसार, मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा वळूंची संख्या जवळपास दुपटीने वाढलेली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.