माद्रिद | कोरोना व्हायरसने जगभरातील १७७ देशांमध्ये थैमान घातले आहे. गेल्या २४ तासांत जगभरात कोरोनाचे ३० हजारांवर नवे रुग्ण आढळले असून १३५४ जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायतक बाब म्हणजे केवळ इटलीत गेल्या २४ तासांत तब्बल ६२७ जणांचा बळी गेला आहे. इटलीत २ मार्चला ५२ मृत होते, गेल्या १९ दिवसांत इटलीमध्ये ३९५० जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्येही मृत्यांचा आकडा १ हजारांहून अधिक झाला आहे. गेल्या २४ तासांत स्पेनमध्ये २६२ जणांचा मृत्यू झाला असून १३ दिवसांत १०६३ जणांनी प्राण गमावले आहेत.
दरम्यान, जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा साधारण पावणे तीन लाखांवर गेला आहे. तर ११ हजार ३८५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करुन ९२ हजार रुग्ण बरेही झाले आहेत. तर ७ हजारांहून अधिक रुग्णांची स्थिती अद्याप गंभीर आहे. स्पेनमध्ये २ क्रीडा पत्रकारांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघ (AIPS)ने दिलेल्या अहवालानुसार जोस मारिया कॅनडेला आणि थॉमस डीएज वाल्डेस या २ क्रीडा पत्रकारांचा मृत्यू झाला. जोस रेडिओ नॅशनल डी स्पेनसाठी काम करत होते, त्यांच्या वय ५९ होते. तर थॉमस हे ७८ वर्षांचे होते. मोटरपॉइंट नेटवर्क एडिटर्सचे संचालकही होते. थॉमस यांनी ३० वर्ष स्पेनमधील एएस या वृत्तपत्रात काम केले होते.
#COVID19 took away two lives from sports media familiy. Spaniards José María "Chema" Candela (59) and Tomás Díaz-Valdés (78) have passed away. Radio Nacional and @diarioas reported the unfortunate events.
Full news🔗https://t.co/yOzkDKOUmn
By @MariaPiaBeltra2 pic.twitter.com/htALQElbbj— AIPS Media (@AIPSmedia) March 20, 2020
आर.एन.ईने दिलेल्या माहितीनुसार जोस यांचे निधन कोरोना व्हायरसमुळे झाले. धक्कादायक बाब म्हणजे ते घरीच मृताअवस्थेत आढळले. त्यांची काल (२० मार्च) टेस्ट होणार होती. पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना अशक्तपणा होता, असे त्यांचे मित्र आणि AIPSचे सदस्य प्रिटो यांनी सांगितले. कोरोना व्हायरसमुळे जगभरात १० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरनाची लागण झालेल्यांची संख्या २ लाखापेक्षा अधिक आहे. चीन पाठोपाठ इटली आणि स्पेनमध्ये करोना व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत.
याआधी स्पेनमध्ये एका फुटबॉल प्रशिक्षकाचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला होता. क्रीडा क्षेत्रात करोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू होता. स्पेनमधील अॅथलिटको पोर्टाडा क्लबचा प्रशिक्षक फ्रासिस्को गार्सिया यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. फ्रासिस्कोचे वय फक्त २१ वर्ष होते. फ्रासिस्को यांना कॅन्सरही होता त्यावरही ते उपचार घेत होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.