HW News Marathi
देश / विदेश

#NirbhayaCase : चारही आरोपींना एकत्र फाशी देणार, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली | निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना एकत्र फाशी द्या, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. निर्भयाच्या चारही आरोपींनी फाशी देण्याचा पतियाळा हाऊस न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असल्याचे उच्च न्यायालयाने आज (५ फेब्रुवारी) सुनावणीदरम्यान सांगितले. या चारही आरोपींना कायदेशीर कारवाईसाठी सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे.

यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी (३१ जानेवारी) निर्भया प्रकरणातील आरोपींची फाशीला स्थगिती देण्यात आली होती. अक्षय ठाकूर (३१), पवन गुप्ता (२५), मुकेश सिंह (३२) आणि विनय शर्मा (२६) निर्भयाच्या चार आरोपींची नावे आहेत.

१६ डिसेंबरची ‘ती ‘ काळरात्र

१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरू झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. त्यावेळी त्यांनी तिला अत्यंत निर्घृणपणे मारहाणही केली होती. त्यामुळे निर्भया गंभीररित्या जखमी झाली होती. यानंतर आरोपींनी निर्भयाला रस्त्याकडेला फेकून दिले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. जखमी निर्भयावर आधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला सिंगापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सिंगापूरमध्ये उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाच्या इंचन् इंच जमिनीवरुन घुसखोरांना बाहेर काढू | अमित शहा

News Desk

सोनिया गांधींनी बोलावली महत्वपूर्ण बैठक! महाराष्ट्रातील राजकारणावर होणार चर्चा?

News Desk

कर्नाटकची एक इंच जमिनीही महाराष्ट्राला देणार नाही, येडियुरप्पांचा निर्धार

News Desk