HW News Marathi
देश / विदेश

#NirbhayaCase : आरोपी पवन गुप्ताची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली | निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी पवन गुप्ताची (स्पेशल लीव्ह पिटीशन) याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने पवन गुप्ताची याचिका फेटाळल्यामुळे त्याच्या फासावर लटकविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. “गुन्हा घडला तेव्हा पवन गुप्ताच्या हा अल्पवयीन होता,” असे या याचिकेत त्याने म्हटले होते. त्यामुळे फाशीची शिक्षा ठोठावू नये, असे आरोपींने त्यांच्या याचिकेत म्हटले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर भानुमती, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती ए एन बोपण्णा यांचे खंडपीठाने पवन गुप्ताच्या याचिकेवर आज (२० जानेवारी) सुनावणी केली असून या न्यायमुर्तींनी आरोपीची याचिका फेटाळून लावली आहे.

फाशीच्या शिक्षा टाळण्यासाठी हे आरोपी अशा गोष्टी करत आहे. जोपर्यंत या चारही आरोपींना फासावर लटकलेले पाहत नाही. १ फेब्रुवारीला जेव्हा त्यांना फाशी देण्यात येईल तेव्हाच मी समाधानी होईल, असे मत निर्भयाच्या आईने आरोपींची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

याआधी दिल्ली उच्च न्यायालयानेही पवनचा अल्पवयीन असल्याचा दावा फेटाळला होता. तसंच वकिलांना २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता. दोषी पवन गुप्ताने न्यायालयाने दिल्लीच्या पटियाला न्यायालयाच्या १९ डिसेंबरच्या आदेशाला आव्हान दिले होते, ज्यात बनावट कागदपत्रे सादर करणे आणि न्यायालयाने हजर न राहण्याबाबत वकिलांना फटकार लगावली होती. निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना पटियाला हाऊस न्यायालयाने ‘डेथ वॉरंट’ जारी केले आहे. या प्रकरणी चारही आरोपींना १ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार असल्यावर निश्चित झाले आहे.

१६ डिसेंबरची ती काळरात्र

१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरू झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. त्यावेळी त्यांनी तिला अत्यंत निर्घृणपणे मारहाणही केली होती. त्यामुळे निर्भया गंभीररित्या जखमी झाली होती. यानंतर आरोपींनी निर्भयाला रस्त्याकडेला फेकून दिले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. जखमी निर्भयावर आधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला सिंगापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सिंगापूरमध्ये उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉग्रेसने मोदी सरकारकडे केल्या ‘या’ १० मागण्या

swarit

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक

News Desk

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे भाषणादरम्यान झाडल्या गोळ्या

Aprna