HW News Marathi
देश / विदेश

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना २२ जानेवारीला फाशी

नवी दिल्ली | देशभरात खळबळ माजवलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना आज पटियाला न्यायालयाने २२ जानेवारी ही फाशीची तारीख निश्चित केली आहे. तब्बल सात वर्षाच्या संघर्षानंतर आज (७ जानेवारी) अखेर निर्भया बलात्कारच्या प्रकरणातील आरोपींना पटियाला न्यायालयाकडून डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. निर्भयाच्या दोषींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येणार आहे.

विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता, मुकेश सिंग अशी या चार नराधमानाची नावे आहेत. या प्रकरणातील राम सिंह नावाच्या आरोपीने तिहार तुरुंगातच आत्महत्या केली होत. याशिवाय एक आरोपी अल्पवयीन असल्याने, ज्युवेनाईल कोर्टाने त्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली होती. २०१५ रोजी त्याची सुटका झाली.

तिहार तुरुंगात निर्भया सामूहिक बलात्कारातील चार दोषींना फाशीची शिक्षा देण्यासाठी तयारी यापूर्वीच केली आहे. निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना एकत्र फाशी देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रात्री निर्भयावर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. यानंतर निर्भयाला पुढील उपचारासाठी सिंगापूरमध्ये नेण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान निर्भयाचा मृत्यू झाला.

१६ डिसेंबरची ती काळरात्र

१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरु झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. तसेच तिला अमानुष मारहाणही केली. त्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न – प्रवीण तोगडिया

swarit

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांची घोषणा, हा तर ओबीसींवर घोर अन्याय !

News Desk

भारतीय सैन्य दलात योगदान देणारे महाराष्ट्रातील ‘परम विशिष्ट सेवा पदक’, ‘शौर्य पदक’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

Aprna