HW News Marathi
देश / विदेश

#NirbhayaCase : दोषी पवन गुप्ताची क्युरेटीव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली | निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना ३ मार्च सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येणार आहे. दोषी पवन गुप्ता यांची क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दोषी पवनने याचिकेत म्हटले की, घटनावेळी अल्पवयीन असल्याचा दावा त्यांनी केला होता. मला फाशीची शिक्षा देण्याऐवजी जन्मठेप द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, आज (२ मार्च) झालेल्या सुनावणीत पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्वसंमतीने पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका फेटाळली.

दोषींची दया याचिका फेटाळल्यानंतर त्याला फासावर लढकविण्यासाठी १४ दिवसांनंतर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकते. यामुळे पवन गुप्ताची याचिका फेटाळ्यानंतर निर्भयाच्या दोषींना फाशीवर अजून वाट पाहवी लागणार आहे. न्यायमूर्ती एन. व्ही. रमन्ना, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती रोहिंग्टन फली नरीमन, न्यायमूर्ती आर भानुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण या पाच न्यायाशीशांच्या खंडपीठासमोर पवन गुप्ताच्या क्युरेटिव्ह पिटिशनची सुनावणी झाली. आणि या पाचही न्यायाधीशांनी एकमताने त्यांची याचिका फेटाळून लावली.

 

१६ डिसेंबरची ‘ती ‘ काळरात्र

१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरू झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. त्यावेळी त्यांनी तिला अत्यंत निर्घृणपणे मारहाणही केली होती. त्यामुळे निर्भया गंभीररित्या जखमी झाली होती. यानंतर आरोपींनी निर्भयाला रस्त्याकडेला फेकून दिले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. जखमी निर्भयावर आधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला सिंगापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सिंगापूरमध्ये उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर प्रदेश सामूहिक बलात्कारातील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू

News Desk

गोव्यात 5.5 इंच पावसाची नोंद

News Desk

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच, एक भारतीय जवान शहीद

News Desk