HW Marathi
देश / विदेश

कच्च्या तेलाच्या किंमतीत २५ टक्के घट, वाचा सविस्तर…

नागपूर | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या ५०  दिवसांत २५ टक्क्यांनी घट झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत १०  टक्के घट झाली आहे. ४ ऑक्टोबर २०१८ रोजी क्रूड ऑइलची किंमत ८६ डॉलर प्रति बॅरल (१५९ रुपये लिटर) होती. त्यानंतर मुंबईत पेट्रोलची किंमत  ९१.३४ रुपये प्रति लिटर होती आणि डिझेलची किंमत प्रति लिटर ८०.१० रुपये होती.

५ ऑक्टोबर २०१८ रोजी किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क २ रुपयांनी कमी करून  १९.४८ रुपयांवरुन १७.४८ रुपये केले. डिझेलवरील एक्साइज ड्युटी देखील १५.३३ ते १३.३३ रुपये प्रति लीटर कमी करण्यात आली आहे. सरकारने २ रुपयांनी व्हॅट कमी केला होता. पेट्रोलवरील व्हॅट ३०.०६  रुपये, जे कमी होऊन २८.०६  रुपये झाले. तर डिझेलवरील व्हॅट २३.४६ ते २१.४६ रुपये प्रति लीटर झाले.

सरकारच्या तीनही तेल कंपन्यांनी प्रति लीटरमागे १ रुपयांनी दर कमी केला होता. मुंबईत पेट्रोलची किंमत ८६.३४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा मुंबईत प्रति लिटर ७५.१० रुपये इतका दर झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारावर कब्जा करण्यासाठी युनायटेड स्टेट्स, सौदी अरेबिया आणि रशियाने क्रूड ऑइलच्या किंमती कमी  केल्या आहेत. हे तीन देश प्रतिदिन विक्री केल्या जाणा-या १० करोड बॅरल तेला पैकी  ३.३ करोड  बॅरल तेलाचे उत्पादन घेतात. परिणामी २१ नोव्हेंबर रोजी कच्च्या तेलाच्या किंमत ६३ डॉलरवर प्रति बॅरल झाल्या होत्या.

गेल्या ५० दिवसांत कच्च्या तेलाची किंमत २५ टक्क्यांनी कमी झाली आहे आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देखील अनुक्रमे ६९.९६  आणि ६८.७४  रुपये  प्रति लीटर पर्यंत जाण्याची आशा होती. परंतु पेट्रोलची किंमत अजूनही ८२.५३ आहे, तर डिझेलची किंमत ७४.६६ रुपये आहे. एकूणच, कच्च्या तेलाची किंमत २५ टक्क्यांनी घसरली असली तरी पेट्रोल आणि डिझेलची किंमत केवळ १० टक्क्यांनी कमी झाली आहे.

या विसंगतीसंदर्भात तीन सरकारी कंपन्या – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम मुख्यालय यांचे कोणतेही अधिकारी काही बोलण्यासाठी तयार नाहीत.

 

Related posts

आधी मार्क्सवाद्यांनी हिंसाचार पेरला, आता ममता बॅनर्जी नेमके तेच करीत आहेत !

News Desk

सीबीआयचे दोन्ही अधिकारी सक्तीच्या रजेवर, नागेश्वर राव अंतरिम प्रमुख

Gauri Tilekar

राजीव गांधी यांनी मुस्लिमांच्या ‘शरीयत’पुढे गुडघे टेकले व घटनेचा अपमान केला !

News Desk