HW News Marathi
देश / विदेश

भारतातील ‘या’ राज्यात आढळला कोरोना व्हायरसचा दुसरा रुग्ण

करेळ | जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसचा दुसरा रुग्ण केरळमध्ये आढळला आहे. हा रुग्ण चीनमधून आला असून त्यांने तपासणी केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णाला कोरोनाचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांच्या निगराणीखाली स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती.

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ३०४ जणांचा मृत्यूमुखी पडले आहेत. तर जवळपास ११ हजार ७९१ लोकांना या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. चीनमधील वुहान शहरात या व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. चीनमध्ये गेल्या २४ तासात तब्बल ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त फटका हुबेई प्रांताला बसला असून येथे ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.

या गंभीर परिस्थितीतून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने एअर इंडियाचे एक स्पेशल विमान पाठवले होते. हे विमान वुहान शहरातील ३२३ भारतीयांना घेऊन दिल्लीला आले आहे. एअर इंडियाच्या या विमानात राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधील पाच डॉक्टर तैनात असून, पॅरामिलिटरी स्टाफही आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एससी-एसटी कर्मचा-यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण नाही | सर्वोच्च न्यायालय

swarit

सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर नरेंद्र मोदी, शरद पवार, राहुल गांधींनी श्रद्धांजली वाहिली

Aprna

तेजस ठाकरेंच्या संशोधनाची ‘आंतरराष्ट्रीय जर्नल’ने घेतली दखल

News Desk