HW News Marathi
देश / विदेश

३ वर्षांच्या मुलीसह १०० कोटींची संपत्ती सोडून संन्यास घेणार

मध्ये प्रदेशातील एका उद्योपती दाम्पत्याने 100 कोटीच्या संपती त्याग करत तीन वर्षांच्या बाळाला देखील सोडण्याचा निर्णय घेतला. अनामिका आणि सुमित राठोड असं या दाम्पत्याचं नाव असून, पुढील आठवड्यात ते सूरतमध्ये दीक्षा घेणार आहेत.

राठोड कुटुंब हे नीमचमधल्या सधन कुटुंबापैकी एक आहे. विशेष म्हणजे सुमितने लंडनमधल्या प्रसिद्ध विद्यापीठात आपलं शिक्षण पूर्ण केल्याचंही समजतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुमितने आपला वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळायला सुरूवात केली. फॅक्टरीसोबत त्यांच्या नावावर कोट्यवधीची मालमत्ता देखील आहे.

तर त्यांची पत्नी अनामिका ही इंजिनिअर आहे. लग्नापूर्वी एका बड्या कंपनीत त्या काम करत होत्या. त्या अभ्यासातही हुशार आहेत. दहावी आणि बारावीमध्ये राजस्थान बोर्डातून त्या पहिल्या आल्या होत्या. काही वर्षांपूर्वीच या दोघांनी लग्न केलाय. अनामिका आणि सुमित या दोघांनाही तीन वर्षांची मुलगी आहे. पण संपत्तीचा त्याग करून आणि आपल्या गोंडस मुलीलाही सोडून त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय पक्का केला आहे.

या दोघांच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. एवढ्या छोट्या मुलीला सोडून कोणी संन्यास कसा घेऊ शकतो? यावर एकदा विचार करावा असेही सल्ले त्यांना दिले. पण जगात अनाथ मुलं आहेत, त्यांना कुठे आई वडिल असतात? त्याचेही संगोपन होतेच ना! असं या दाम्पत्याचं म्हणणं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुलगाममध्ये सुरु असलेल्या चकमकीत १ दहशतवाद्याचा खात्मा

News Desk

प. बंगालमध्ये निवडणुकीत हिंसाचार, भाजप उमेदवारावर हल्ला तर माध्यमांच्याही फोडल्या गाड्या 

swarit

मोठी बातमी! ‘प्रशांत किशोर यांनी मुख्य सल्लागार पदाचा दिला राजीनामा’

News Desk