नवी दिल्ली | कोरोनाशी लढण्यासाठी खासदारांचा ३० टक्के पगार कपात करण्याचा निर्णय केंद्राने आज (६ एप्रिल) घेतला आहे. देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि सध्याची देशाची आर्थिक स्थिती पाहता आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याची वेतनात ३० टक्के कपात होणार आहे. आज कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली आङे. सध्या १२ महिन्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातल्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे.दरम्यान, दशावर आलेल्या कोरोनाशी लढता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Union Cabinet approves Ordinance amending the salary, allowances and pension of Members of Parliament Act, 1954 reducing allowances and pension by 30% w.e.f. 1st April, 2020 for a year. pic.twitter.com/afToRH8bfy
— ANI (@ANI) April 6, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.