HW Marathi
देश / विदेश

भारतात घुसखोरी करण्यासाठी ३०० दहशतवादी प्रयत्नशील | लष्करप्रमुख

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा आणि दहशतवाद या दोन गोष्टी एकत्र होऊ शकत नाही. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणखी सुधारण्याची गरज आहे. भारतात घुसखोरी करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ जवळपास ३०० दहशतवादी दबा धरून असल्याची माहिती भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिली आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत हे दिल्लीतील वार्षिक परिषदेत बोलत होते.

“तालिबान प्रकरण आणि जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती याची तुलना होऊ शकत नाही”, असेही बिपीन रावत यावेळी म्हणाले. भारतीय सैन्याच्या नॉर्डर्न कमांडला २० जानेवारीला नवीन स्नायपर रायफल्स मिळणार असल्याचीही माहिती देखील बिपीन रावत यांनी दिली आहे.

“जम्मू-काश्मीर ही देशांची समस्या आहे. यात तिसऱ्या कोणालाही हस्तक्षेप करण्यास जागा नाही. आम्हाला आमच्या नियम व अटींनुसार बोलणे आवश्यक आहे. आमचे नियम व अटी अत्यंत स्पष्ट आहेत. चर्चेसाठी या, चर्चा करू. परंतु बंदूक सोडा, हिंसा सोडा”, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले आहे.

“भारतीय सैन्याकडून जाणूनबुजून नागरिकांना लक्ष्य केले जात नाही. परंतु, आम्ही हे जाणतो कि शेजारील देशातील असे अनेक दहशतवादी कार्यरत आहेत जे सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून, आम्हला एक नागरिक आणि दहशतवादी यांच्यातील फरक ओळखणे कठीण होते”, असेही बिपीन रावत यांनी म्हटले आहे.

Related posts

छत्तीसगडमध्ये चकमक, १० नक्षलवाद्यांना कंठस्नान

News Desk

मोदींच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक, ममता बॅनर्जींची अनुपस्थिती

News Desk