HW News Marathi
देश / विदेश

मुंब्र्यातून ४ तर औरंगाबादमधून ५ जण एटीएसच्या ताब्यात

मुंबई | इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून आज (२२ जानेवारी) मुंब्र्यातील कौसा, अमृतनगर येथून ४ जणांना तर औरंगाबादमधून ५ जणांना एटीएसकडून ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्वजण गेल्या अनेक दिवसांपासून एटीएसच्या रडारवर होते. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्वाची कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईत अथवा महाराष्ट्रात काही घातपाती कृत्य होण्याची शक्यता एटीएसला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

ताब्यात घेण्यात आलेले हे ९ जणांचे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंध असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या महिन्यात एनआयएकडून दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये १६ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. दिल्लीच्या जाफराबाद आणि उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये इसिस संघटनेशी संपर्कात असलेल्या ठिकाणांवर ही मोठी कारवाई करण्यात आली होती.

Related posts

जाणून घ्या…याआधी कधी भारतीय लष्करावर झाले दहशतवादी हल्ले

News Desk

शहा-मोदी जोडीवर पुन्हा टीका

News Desk

102 व्या घटनादुरुस्तीत बदल करणारे विधेयक आज लोकसभेत मांडलं!

News Desk