HW News Marathi
देश / विदेश

विजय माल्याला अटक

लंडन किंगफिशर एअरलाइन्स मालक विजय माल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला लंडन येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यामुळे विजय माल्या यांच्या भारताकडे हस्तांतरण करण्यास चालना मिळेल असा अंदाज आहे. स्कॉटलंड यार्ट पोलिसांनी माल्याला अटक केली आहे.

माल्याच्या प्रत्यार्पणासाठी परराष्ट्र मंत्रालयाने 9 फ्रेबुवारी रोजी ब्रिटिश सरकारला प्रस्ताव पाठवला होता. ‘माल्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयकडून आलेला प्रस्ताव ब्रिटिश सरकारकडे सोपवण्यात आला आहे. माल्याविरोधात भारतात खटला चालवण्यासाठी त्याला भारताकडे सोपवण्यात यावे’, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी दिली होती

बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विजय माल्या देशाबाहेर पसार झाला होता. यानंतर माल्याची देशवापसी करण्यासाठी केंद्र सरकारने बरेच प्रयत्न केले. विजय माल्याचा पासपोर्ट सरकारकडून रद्द करण्यात आला होता. तीनवेळा समन्स बजावूनही विजय माल्या हजर न झाल्यामुळे सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला त्यांचा पासपोर्ट रद्द किंवा हस्तगत करावा, असे कळवले. माल्यावर मायदेशी परतण्याचा दबाव निर्माण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली होती.

मुंबईतील विशेष न्यायालयाने माल्याला फरार म्हणून घोषित केले होते. अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयाकडे मागणी केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला होता.

विजय मल्ल्यांविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाईला सुरुवात करत आयडीबीयच्या 900 कोटीं कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत असलेल्या ईडीने त्याची 1411 कोटींची मालत्ता जप्त केली. माल्या आपल्या मालमत्तेची विक्री सुरू केल्याची कुणकुण ईडीला लागताच तातडीने जप्तीची कारवाई करण्यात आली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महीला आयएएस अधिकारी लैंगिक छळाची शिकार

News Desk

इम्रान खानची भारतावर आण्विक हल्ला करण्याची धमकी

News Desk

चीनचा संताप अनाठायी

News Desk