ईटानगर | अरुणाचल प्रदेशमधल्या सियांग जिल्ह्यात हवाई दलाचे दुर्घटनाग्रस्त विमान एएन-३२ मधीव सर्व १३ जवांन शहीद झाल्याची माहिती भारतीय हवाई दलने माहिती दिली आहे. १५ सदस्याच्या बचाव पथकाने एएन विमानाचे अवेशष सापडल्यानंतर यात प्रवास करणाऱ्या जवानांचे शहीद झाल्याचे स्पष्ट केल्याची भारतीय हवाई दलाने सर्व माहिती ट्वीटद्वारे दिली आहे. या बचाव पथकामध्ये एअरफोर्स, लष्कराचे जवान आणि गिर्यारोहकांचा समावेश होता.
IAF: Following air-warriors lost their lives in #AN32 aircraft crash: Warrant Officer KK Mishra, Sergeant Anoop Kumar, Corporal Sherin, Lead Aircraft Man SK Singh, Lead Aircraft Man Pankaj, Non-combatant Employee Putali & Non-combatant Employee Rajesh Kumar. (2/2) https://t.co/FDDgLZ1lJW
— ANI (@ANI) June 13, 2019
बचाव पथकाला एअरलिफ्ट करून विमानाच्या अवशेषांपर्यंत नेण्यात आले. त्यानंतर त्यांना हेलिड्रॉप केले असून १२ जून भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता विमान एएन-३२ अवशेष अरुणाचलमधील सियांग जिल्ह्यात दिसले होते. दुर्घटनाग्रस्त विमान फारच उंचावर आणि घनदाट जंगलामध्ये आहे. अशा ठिकाणी पोहोचणे हे आव्हानात्मक होते.
Indian Air Force: IAF pays tribute to the brave air-warriors who lost their lives during the #AN32 aircraft crash on 3 Jun 2019 and stands by with the families of the victims. May their souls rest in peace. https://t.co/SJjGYIwIcj
— ANI (@ANI) June 13, 2019
भारतीय हवाई दलाचे एएन-३२ विमान ३ जूनपासून बेपत्ता होते. गेल्या आठ दिवसापासून या विमानाचा शोध घेतला जात होता. एएन हे मालवाहू विमान आसाममधील जोरहाट विमानतळावरून दुपारी १२.२५ वाजल्यापासून संपर्क तुटल होता. या विमानात ५ प्रवासी ८ क्रू मेंबर्स असे एकूण १३ प्रवासांना घेऊन विमान अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथे जाणार होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.