वृत्तसंस्था- तामिळनाडूच्या एआयएमडीकेच्या प्रमुख शशिकला सध्या बेंगुरूळच्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. परंतु जेलमध्ये त्यांना विशेष सोयी-सुविधा पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार जेलच्याच एका अधिकाऱ्याने उघडकीस आणला आहे. शशिकलासाठी जेल अधिकाऱ्यांनी तब्बल दोन कोटी खर्चाचे किचन उभारले आहे, या ठिकाणाहून शशिकलासाठी विशेष भोजन तयार केले जाते. तिच्या राहण्याखाण्यासाठी वेगळी बडदास्त ठेवली जात असून तो जेल कायद्याचा भंग असल्याची तक्रार एका जेल अधिकाऱ्याने केली आहे. वरिष्ट जेल अधिकारी यात सहभागी असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्रीपद मिळवण्यावरून शशिकला यांनी पनीरसेल्वम यांच्याशी पंगा घेतला होता. परंतु भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात त्यांना जेलची हवा खावी लागली. त्यात त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगले. परंतु त्या आजही जेलमध्ये नव्हे तर जयललितांच्या अलिशान घरात राहत आहेत की काय असा प्रश्न या घटनेवरून पडतो.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.