HW News Marathi
Covid-19

कोरोनावर ४ लसींचे लवकरच क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार

मुंबई | संपूर्ण जग हे कोरोनाच्या विळख्यात आहे. तर भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख ३८ हजार ८४५ झाली आहे. यामुळेच जगातील कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी देशातील वैज्ञानिकही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. देशात १४ ठिकाणी कोरोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी ४ लसींचे लवकरच क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

भाजपा नेते जी. व्ही. एल. नरसिम्हा राव यांच्या सोशल मीडियावरून साधलेल्या ऑनलाईन संवादात बोलताना आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, ‘संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या महामारी रोखण्यासाठी लस विकसित करत आहे. लस तयार करण्यासाठी १०० हून अधिक जण काम करत असून विविध टप्प्यांवर काम केले जात आहे. जागतिक आरोग्य संघटना या प्रयत्नांसाठी मदत करत आहे. कोरोनावर मात लस पूर्णपणे तयार होण्यासाठी जवळपास १ वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर बाळगण्याच्या नियमांचे कडेकोट पालन करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोग्यमंत्र्यांना जेवायलाही पुरेसा वेळ मिळेना…गाडीत बसूनच राजेश टोपेंचा अल्पोपहार!

News Desk

अजित पवारांचं सगळं ऐकता मग ‘हे’ का ऐकत नाही?, सुप्रिया सुळेंकडून कार्यकर्त्यांची कानउघाडणी

News Desk

‘कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या

News Desk