नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुरवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचे कट उधळून लावण्यास सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. जवानांनी पुलवामातील अयानगुंज परिसरात संशयित एक पांढऱ्या रंगाची सॅंट्रो कार ताब्यात घेतली. या कारमध्ये मोठ्या प्रमाणात आयईडी सापडले होते. सुरक्षा दलाच्या पथकांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्याचा कट होता. पण, सुरक्षा दलाने योग्य वेळी दहशतवाद्यांचा कट उधळून लावला.
A major incident of a vehicle-borne IED blast averted by the timely input and action by Pulwama Police, CRPF and Army: Kashmir Zone Police #JammuAndKashmir pic.twitter.com/oR0aVMZYG0
— ANI (@ANI) May 28, 2020
‘पुलवामामध्ये मोठ्या दहशतवाद्यांचा मोठा डाव होता. मात्र, पुलवामा पोलीस, सीआरपीएफ आणि भारतीय सैन्य दलाच्या या तिन्ही दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईमुळे वाहनाद्वारे आयइडी स्फोट घडवून आणण्याचा कट उधळून लावण्यात यश आल्याची अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली आहे, असे एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितले.
पुलवामा पोलीस, सीआरपीएफ आणि सैन्याने संयुक्त कारवाई करत आयईडी ठेवण्यात आलेली संशयित कार ओळखली. पांढर्या सॅंट्रो कारला दुचाकी नंबर प्लेट लावण्यात आली होती. कारची नंबर प्लेट कठुआमध्ये नोंदणी आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी तिला ट्रॅक केल्यानंतरही माहिती मिळाली. त्यानंतर बॉम्बचा शोध घेण्यात आला. बॉम्ब शोधक युनिट येण्यापूर्वी आजूबाजूचा परिसर रिकामी करण्यात आला, मिळालेल्या माहिती मिळाली.
पुलवामामधील दहशतवादी हल्ला
याआधी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. पुलवाम्यातील अवंतीपोरा येथे झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आयईडीने भरलेल्या अशाच एका कारचा वापर केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.