HW News Marathi
देश / विदेश

रोड शोदरम्यान पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकावली

नवी दिल्ली | आम आदमी पार्टीचे (आप) अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज (५ मे) दिल्लीमधील एका रोड शोदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने श्रीमुखात भडकावली. केजरीवाल यांच्यावर असा हल्ला होण्याचा ही काही पहिलीच वेळ नाही. या अज्ञात व्यक्तीने जीपवर चढून केजरीवाल यांच्या कानशीलात लगावली. या तरुणाला आपच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेत पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. या तरुणाचे नाव सुरेश असल्याचे सांगितले जात आहे. तो कैलास पार्कमध्ये राहतो.

केजरीवाल यांच्यावर एप्रिल 2016 मध्ये दिल्ली सचिवालयात पत्रकार परिषदेतच त्यांच्यावर बूट फेकण्यात आला होता. हा व्यक्ती आम आदमी सेनेचा कार्यकर्ता वेदप्रकाश शर्मा होता. तसेच फेब्रुवारी २०१६ मध्ये लुधियानामध्ये केजरीवाल यांच्या कारवर काही लोकांनी लोखंडी रॉड आणि दांड्यांनी हल्ला केला होता. ज्यामध्ये कारची काच फुटली होती. जानेवारी २०१६ मध्ये छत्रसाल स्टेडिअममध्ये महिलेने शाई फेकली होती. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांच्या एका रिक्षाचालकाने कानाखाली मारली होती. तसेच अन्य एका ठिकाणी त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोना’चे गांभीर्य वाटावे असा माहोल नसेल तर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या चिंतेचा मतलब काय?

swarit

Independence Day 2020 | जाणून घ्या… काय आहे लाल किल्ल्याचा इतिहास

News Desk

पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राइक’ होणार ?

swarit