मुंबई | गुजरातच्या (Gujarat) मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल (Morbi Bridge Collapse) कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 140 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत नदीत पडलेल्या लोकांचा शोध सुरू असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती गुजरात सरकारकडून मिळाली आहे.
गुजरातमध्ये रविवारी रात्री मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्याने 140 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या पुलावर जवळपास 400 हून अधिक झुलता पुलावर उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. लोक नदीत कोसल्याची भीती व्यक्त केली जात होती. या घटनेची माहिती मिळातच एनडीआरएफ आणि गरुड कमांडो घटनास्थळी धाव घेतली. तसेच हा पूल 5 दिवसांपूर्वीच हा पूल प्रशासनाने दुरुस्त करण्यात आला होता.
PM @narendramodi spoke to Gujarat CM @Bhupendrapbjp and other officials regarding the mishap in Morbi. He has sought urgent mobilisation of teams for rescue ops. He has asked that the situation be closely and continuously monitored, and extend all possible help to those affected.
— PMO India (@PMOIndia) October 30, 2022
“या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. आणि या बचाव कार्यासाठी त्यांनी तातडीने पथके तयार करण्याची मागणी केली आहे. त्यांनी परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवण्यास सांगितले आहे आणि प्रभावित झालेल्यांना शक्य ती सर्व मदत द्यावी”, असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे. तर या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजाराची मदत देखील पंतप्रधांनी ट्वीट करत जाहीर केल्याची माहिती दिली.
PM @narendramodi has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each of those who lost their lives in the mishap in Morbi. The injured would be given Rs. 50,000.
— PMO India (@PMOIndia) October 30, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.