मुंबई | महाराष्ट्राच्या एसटी बसला मध्य प्रदेशातील इंदूर भीषण अपघात झाला आहे. ही एसटी इंदूरहून जळगावमधील अमळनेकडे येण्यासाठी निघाली होती. परंतु, ही एसटी बस खलघाटातील संजय सेतू पुलावरून 25 फूस खोल नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर 10 ते 12 जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही एसटी बस आज (18 जुलै) सकाळी 7 वाजताच्या सुमारास इंदूरहून जळगावमधील अमळनेकडे येण्यासाठी निघाली होती.
दरम्यान, पुलावरून नदी पडलेल्या एसटी बस क्र. MH40 N 9848 असा असून या बसला क्रेनच्या सह्याने बाहेर काढण्यात यश आले असून बेपत्ता प्रवाशांचे शोध सुरू आहे. या बसमधून 50 हून अधिक प्रवास प्रवास करत होते. या बस अपघाता 13 जणांचा मृत्यू झाला तर 10 ते 12 जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना इंदूरमधील धामनोद सरकार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यातआले आहे.
12 people dead, 15 rescued after a Maharashtra Roadways bus going from Indore to Pune falls off Khalghat Sanjay Setu in Dhar district, says Madhya Pradesh minister Narottam Mishra. pic.twitter.com/h4FuW2B3Ch
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) July 18, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.