HW News Marathi
देश / विदेश

रक्षाबंधनाला शौचालयाची भेट

लखनऊ – केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. तसेच उघड्यावर शौच न करण्याचे आवाहनही विविध जाहिरातीमधून करण्यात येत आहे. उघड्यावर जाताना महिलांच्या होणाऱ्या कुचंबणेला ठिकठिकाणी वाचा फोडण्यात येत आहे. याच अनुकुल परिणाम झाल्याचे अनेक उदाहरणांतून दिसत आहे. असेच एक उदाहरण लखनऊमधील आहे. बहिणीची व्यथा जाणून येथील एका भावाने चक्क शौचालयाची रक्षाबंधन भेट देत, नवा आदर्श घालून दिला आहे.

उत्तरप्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातील रुद्रगढ नौसी गावातील एका मुलाने ही अनोखी भेट दिली आहे. घरी शौचालय नसल्यामुळे बहिणीला त्रास सहन करावा लागतो, आपण ते पाहू शकत नाही, त्यामुळे हे गिफ्ट दिल्याचे मुलाने सांगितले. राखी शौचालय असेनाव या टॉयलेटला देण्यात आले असून ते फुग्यांनी सजवण्यातही आले आहे.

टॉयलेट गिफ्ट देण्यासाठी मोठ्या कष्टाने १५ हजारांची जमवाजमव केली. माझ्यासारख्या व्यक्तीसाठी ही खूप मोठी रक्कम आहे, सेही तो म्हणाला. दरम्यान यूपीमध्ये अनेक भावांनी आपल्या बहिणीसाठी शौचालय बांधली आहेत. आज रक्षाबंधनादिवशी ही शौचालये बहिणींना भेट दिली जाणार आहेत. तरुणाच्या उपक्रमाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनीही घेतली. त्याला जिल्ह्याचा ब्रँडएम्बेसिडर बनवण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा तृणमूलमध्ये दाखल

News Desk

मेट्रो सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार

News Desk

कृषी कायद्याबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे शरद पवारांनी केले स्वागत

News Desk