HW Marathi
देश / विदेश राजकारण

अरविंद केजरीवाल घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आम आदमी पार्टीला मोठा विजय मिळाला आहे. आपला निवडणुकीत ७० जागांपैकी ६२ जागांवर विजय मिळवित एकहाती सत्ता मिळाली आहे. तर भाजप ८ जागांवर समाधान मानावले लागले. आपचे राष्ट्रीय संयोजनक अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहे. अरविंद केजरीवाल येत्या १६ फेब्रुवारीला दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीच्या रामलीला मैदानात अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदावर शपथ घेणार आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीप्रमाणे काँग्रेसची कामगिरी गेल्या निवडणुकीसारखीच निराशाजनक राहिली आहे. त्यांच्या ६३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेले आहे. आपला ६२ जागांसह आपला ५३.५७ टक्के मते मिळाली आहेत, तर भाजपला ३८.५१ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही, त्यांना ४.२६ टक्के मते मिळालेली आहेत. आता आपच्या नव्या कॅबिनेटचीही चर्चा सुरू झाली आहे. मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, राजेंद्र पाल गौतम यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

 

Related posts

लोकलचा प्रवास सुखकारक, दरवाजांवर ‘सेफ्टी’ सेन्सर

News Desk

#NirbhayaCase : पुढील आदेशापर्यंत दोषींच्या फाशीला स्थगिती

रघुराम राजन यांना अर्थशास्रातील नोबेल ?

News Desk