HW News Marathi
देश / विदेश राजकारण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचल्याचा ‘आप’चा आरोप

मुंबई | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल तक्रार करण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार असल्याचे आम आदमी पक्षाने (AAP) शुक्रवारी सांगितले. पत्रकार परिषदेत, आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज (Saurabh Bharadwaj) म्हणाले की निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांच्यासोबत दिल्ली पोलिसांचा संरक्षण असताना सुद्धा हल्ले झाले आहेत.

भाजपचे दोन बाल्लेकिल्ले असलेले एमसीडी (MCD) आणि गुजरात (Gujarat) निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजप कट रचत आहे. या भीतीपोटी भाजप खासदार मनोज तिवारी आणि इतर लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला आहे, असा आरोप त्यांनी केला. भारद्वाज पुढे म्हणाले की, तिवारी यांच्या कथित धमकीबद्दल तक्रार देण्यासाठी आणि पोलिस तक्रार दाखल करण्यासाठी आज राज्य निवडणूक आयुक्त विजय देव यांची भेट घेणार आहेत.

काय म्हणाले होते मनीष सिसोदिया?

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देखील या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. गुजरात आणि एमसीडीमधील निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने भाजपने केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केल्याच्या एका दिवसानंतर, मनीष सिसोदिया यांनी शुक्रवारी याची चौकशी करण्याची मागणी केली असून निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील सादर केली जाईल असे सांगितले. भाजप नेते मनोज तिवारी यांनी गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात जी भाषा वापरली ती ‘खुली धमकी’ असल्याचा दावाही सिसोदिया यांनी केला.

सिसोदिया यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना तिवारी म्हणाले, मला अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेची काळजी आहे. केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या भाजपची जुनी स्क्रिप्ट सिसोदिया वाचत आहेत. केजरीवाल यांनी दावा केला की सिसोदिया यांना अटक केली जाईल तर सिसोदिया यांनी केजरीवाल यांच्या हत्येची भविष्यवाणी केली. मला माहित नाही काय चालले आहे, असे तिवारी यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचं ‘मिशन बारामती’ यशस्वी होणार? का भडकल्या निर्मला सीतारामन

Manasi Devkar

राष्ट्रवादीचे ‘राष्ट्रीयत्व’च धोक्यात, निवडणूक आयोगाची नोटीस

News Desk

असंख्य नवरे बोलत असतील, बायको शिवसेनेसारखी पाहिजे !

News Desk