HW News Marathi
देश / विदेश

CPMचे महासचिव सीताराम यचुरी यांना पुत्रशोक

नवी दिल्ली | सीपीएमचे महासचिव सीताराम यचुरी यांचा जेष्ठ पुत्र आशिष यचुरी यांचं कोरोनामुळे निधन झालंय. गुरुवारी सकाळी गुडगावमधील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिताराम यचुरी यांनी एक ट्विट करत ही दु:खद बातमी दिली आहे.

२ आठवड्यांपूर्वी आशिष यचुरी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मेदांता हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असताना आशिष यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र पहाटे आशिषच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचं जवळच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.

 

सीताराम यचुरी यांनी ट्वीट करत मुलाच्या निधनाची दु:खद बातमी दिली आहे. ”मला हे सांगताना खूप दु:ख होत आहे की माझा मोठा मुलगा आशिष यचुरी याचं करोनामुळे निधन झालं आहे. ज्यांनी आम्हाला एक आशा दिली, ज्यांनी त्याच्यावर उपचार केले त्या डॉक्टरांचे, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार आणि आमच्या पाठीशी उभं राहणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो,”असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेना ४०-५० जागा लढवणार –  संजय राऊत

News Desk

अडीचशे वर्ष जगलेल्या माणसाची कथा

News Desk

तेजस्वी यादवच बिहार निवडणूकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’, संजय राऊतांची प्रतिक्रिया

News Desk