HW Marathi
Covid-19 देश / विदेश

आम्ही कधीही कोरोनावर औषध तयार केल्याचा दावा केला नव्हता, पतंजलीचा यू-टर्न

मुंबई | संपूर्ण जगभरात कोरोनावर लस शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर भारतात योग गुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलीने कोरोनिल नावाचे आयुर्वेदिक औषध लॉन्च केले होते. औषधामुळे कोरोनाचे रुग्ण १०० टक्के बरा होण्याचा दावा रामदेव बाबा यांनी केला होता. या औषधाच्या लॉन्चनंतर अवघ्या काही तासात जाहिरातीवर आयुष विभागाकडून बंदी घालण्यात आली होती. यानंतर देशातील विविध राज्यांनी पतंजलीच्या औषध विक्रीवर बंदी घातली होती. यानंतर आता मात्र, आम्ही कधीही कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केला नव्हता, कोरोना रुग्ण बरे होतील, असा म्हणत पतंजली आयुर्वेदचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण यांनी यू-टर्न घेतला आहे.

आचार्य बाळकृष्ण म्हणाले, ‘क्लिनिकल ट्रायल केल्यानंतर जो निष्कर्ष आला तो आम्ही संपूर्ण देशाला सांगितला. आम्ही असे म्हणालो नाही की, हे औषध कोरोनावर उपचार म्हणून वापरले जाऊ शकते. आम्ही असे म्हणालो होतो की, या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल दरम्यान, कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. यामध्ये काहीच शंका घेण्यासारखे नाही.’

पतंजलीचे योगगुरु बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी २३ जून रोजीएक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी रामदेव बाबा म्हणाले की, संपूर्ण सायंटिफिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस असलेले पहिले आयुर्वेदिक औषध आहे. पतंजलीच्या मते, हा रिसर्च संयुक्तपणे पतंजली रिसर्च इंस्टीट्यूट (पीआरआय) हरिद्वार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस (NIMS), जयपूरने केला आहे. या औषधाची निर्मिती दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वारकडून केली जात आहे.

 

 

Related posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून डॉक्टरांच्या सुरक्षेचे आश्वासन

News Desk

राफेलविरोधातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळल्या

News Desk

लॉकडाऊनमध्ये कोणतीही विशेष ट्रेन चालवण्यात येणार नाही, रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

News Desk