HW News Marathi
देश / विदेश

अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांना २१ व्यांदा ऑस्करमध्ये नामांकन

न्यूयॉर्क | हॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री ६८ वर्षीय मेरील स्ट्रीप यांनी एक नवा इतिहास रचला आहे. ऑस्कर अवॉर्ड्साठी त्यांना २१ व्यांदा नामांकन मिळवले आहे. स्टीव्हन स्पिल्सबर्ग दिग्दर्शित ‘द पोस्ट’ सिनेमातील कॅथरिन ग्राहम या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी मेरील स्ट्रीप यांना नामांकन मिळाले आहे. गेल्या काही वर्षापासून सर्वाधिक ऑस्करमध्ये नामांकन पटकवण्याचा स्वत:चाच विक्रम स्ट्रीप यांनी मोडित काढला आहे.

याआधी मेरील स्ट्रीप यांना ऑस्करमध्ये २० वेळा नामांकन मिळाले असून त्यापैकी तीन वेळा ऑस्कर अवॉर्ड मिळाले आहे. १९७९मध्ये मेरील यांना पहिल्यांदा नामांकन मिळाले असून १९८०मध्ये दुसऱ्यांदा क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाले आहे. १९८३मध्ये तिसऱ्यांदा सोफीज चॉईस या सिनेमासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा ऑस्कर अवॉर्ड मिळाले. २०१२मध्ये द आयर्न लेडी या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट ऑस्कर अवॉर्ड मिलाळे आहे. आतापर्यंत मेरील यांना १५६ विविध पुरस्कार मिळाले असून ३८९ यापेक्षा जास्त वेळा त्यांना इतर पुरस्कारात नामांकन मिळाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रख्यात वकील इंदिरा जयसिंह यांच्या घरावर सीबीआयचा छापा

News Desk

मेहुल चोक्सी केवळ तब्येतीची कारणे देत कारवाईस विलंब करत आहे !

News Desk

मध्य प्रदेश: व्यापमं घोटाळ्यातील आणखी एका आरोपीची आत्महत्या

News Desk
महाराष्ट्र

”जिथे विषय गंबीर तिथे मनसे खंबीर” मनसे देणार पद्मावतला पाठिंबा

News Desk

मुंबई | संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ला देशभरातील अनेक राज्यांमध्ये करणी सेनेने विरोध केलेला असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वादात उडी घेतली असून या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे.

पद्मावतला सेन्सॉर बोर्ड आणि सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला असताना करणी सेनेने त्याला विरोध करणे चुकीचे आहे, असे सांगत मनसेच्या सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्रात ‘पद्मावत’ प्रदर्शित होण्यासाठी आवश्यकता भासल्यास मनसे सज्ज असेल,’ असे मत व्यक्त केले आहे.

सुप्रीम कोटार्ने पद्मावत सिनेमा सर्व राज्यांमध्ये रिलीज करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र गुजरातमध्ये हा सिनेमा रिलीज न होण्याची चिन्हं आहेत. कारण नुकसानीच्या भीतीने मल्टीप्लेक्स मालकांनी सिनेमा रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे. “देशाचे पंतप्रधान ज्या राज्याचे आहेत, त्या राज्यातच जर कायदा व सुव्यवस्था राखली जाणार नसेल, त्या राज्यातच जर सिनेमा प्रदर्शित होणार नसेल तर इतर राज्यांमध्ये कायदा-सुव्यवस्थेची किती वाईट स्थिती असेल, याचा विचारही करवत नाही” अशी टीकाही शालिनी ठाकरे यांनी केली.

Related posts

“मोदी महाराष्ट्रात का आले नाही असा सवाल करता, मग मुख्यमंत्र्यांचा दोनच जिल्ह्यांचा दौरा का?”

News Desk

आजचा कृषिदिन हा शेतकऱ्यांसाठी काळा दिवस – संजय राऊत

News Desk

बीडमध्ये क्लबवर छापा; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंसह ५० जणांवर गुन्हा दाखल!

News Desk