HW News Marathi
देश / विदेश

अदानी समूह NDTV चे 29.18 टक्के शेअर्स खरेदी करणार

मुंबई | अदानी समुहाने एनडीटीव्ही (NDTV) मिडीया ग्रुपचे 29.18 टक्के शेअर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अदानी समुहाने आणखी 26 टक्के शेअर्स खरेदी करण्याची खुली ऑफर दिल्याचे त्यांनी त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

 

अदानी ग्रुपने त्यांच्या निवेदनात म्हटले, “अदानी ग्रुपची उपकंपनी असलेले एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडमधील म्हणजे एनडीटीव्हीतील 29.18 टक्के शेअर्स विकत घेतले आहे. तसेच 26 टक्के शेअर्स खरेदी करण्याची खुली ऑफर त्यांनी दिली असून 493 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. एनडीटीव्हीचे एका शेअरची किंमत 294 रुपये असेल. एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये बाजारात 5 टक्के वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. यानुसार, एनडीटीव्हीचे शेअर्स 376.55 रुपयांवर पोहोचले आहेत.

 

एएमएनएल (AMNL) ची मालकी ही त्यांची उपकंपनी व्हीसीपीएल (VCPL)कडे आरआरपीआर (RRPR) होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडचे वॉरेट आहे. आरआरपीआर (RRPR) मधील शेअर 99.99 टक्के शअर्समध्ये रुपांतरित करण्याचा अधिकार आहे. व्हीसीपीएल (VCPL) ने आरआरपीआर (RRPR) मधील 99.05 टक्के शेअर्स मिळविण्यासाठी वॉरेटचा वापर केला आहे. यानंतर AMNL ची पूर्ण मालकी असलेली उपकंपनी VCPL कडे RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडवर नियंत्रण मिळवले. आणि आरआरपीआर (RRPR) कंपनी एनडीटीव्हीमध्ये 29.18 टक्के शेअर्स आहे,” असे अदानींनी त्यांच्या निवेदात म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तानसह उत्तर भारत हादरले

swarit

#DelhiResults : दिल्ली निवडणुकीच्या निकालाला मी जबाबदार !

swarit

रशिया करणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित

News Desk