HW Marathi
Covid-19 देश / विदेश

ब्रिटनमध्ये अदर पूनावाला करणार 2 हजार 200 कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली | भारतात कोरोनाची सुनामी आली आहे. यामुळे देशात कोरोना लशीची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने लशीच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहे. या निर्बंधामुळे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून इतर देशांना लस मिळत नसल्याचे चित्र आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सिरमने ब्रिटनमध्ये प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावालांकडून ब्रिटनमध्ये 30 कोटी डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी याबद्दल घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ब्रिटनमझ्ये गुंतवणूक करणार आहे. भविष्यात सिरम ब्रिटनमध्ये लस उत्पादन सुरू करणार आहे. सिरम 33.4 कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

जगातील आघाडीची लस उत्पादक कंपनी असलेल्या सिरमने अॅस्ट्राझेनेकाच्या कमी खर्चिक कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. याचबरोबर नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लशीची चाचणीही सिरमने ब्रिटनमध्ये सुरू केली आहे. युरोपीय युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटन गुंतवणूकदारांना देशात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

या अंतर्गत भारतातून तब्बल 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक ब्रिटनमध्ये होणार आहे. यातून ब्रिटनमध्ये 6 हजार 500 रोजगार निर्माण होणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यात आज व्हर्च्युअल माध्यमातून संवाद होणार असून, याआधीच याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.

ब्रिटनने भारतीय प्रवाशांवर बंदी घालण्याआधीच आठ दिवसांपूर्वी अदर पूनावाला लंडनमध्ये दाखल झाले आहेत. सिरमची लस उत्पादनाची क्षमता जुलैपर्यंत दरमहा 10 कोटी डोसपर्यंत जाऊ शकेल. पुढील सहा महिन्यांत सिरमची वार्षिक उत्पादन क्षमता अडीच अब्ज डोसवरुन 3 अब्ज डोसवर नेण्याचा प्रयत्न आहे, असेही पूनावालांनी म्हटले आहे.

Related posts

आता दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ?

News Desk

जपानचे शिंजो अबे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

News Desk

वाजपेयींच्या निधनामुळे सात दिवस राजकीय दुखवटा

News Desk