नवी दिल्ली | निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. मात्र, या दोषींना माफ करुन त्यांची फाशीची शिक्षा रद्द करावी अशी धक्कादायक विनंती ज्येष्ठ महिला वकील इदिंरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईला केली आहे.
“मी निर्भयाच्या आईच्या दु:खाला समजू शकते. मात्र, आरोपींच्या मृत्यूदंडाला माझा विरोध आहे. मी निर्भयाच्या आईला विनंती करते की, त्यांनी सोनिया गांधी यांच्यासारखं आरोपींना फाशीची शिक्षा देऊ नये. सोनिया गांधींनी जसं आपले पती राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना माफ केलं होतं तसंच निर्भयाच्या आईनेही त्या चार जणांना माफ करावं अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.
While I fully identify with the pain of Asha Devi I urge her to follow the example of Sonia Gandhi who forgave Nalini and said she didn’t not want the death penalty for her . We are with you but against death penalty. https://t.co/VkWNIbiaJp
— Indira Jaising (@IJaising) January 17, 2020
“ एक महिला असूनही वकील इंदिरा जयसिंह यांना अशाप्रकारचा सल्ला देण्याची हिंमत कशी झाली? मी त्यांना सुप्रीम कोर्टात अनेकदा भेटली आहे. त्यावेळी त्यांनी एकदाही माझी विचारपूस केली नाही. आज त्या आरोपींच्या बाजूने बोलत आहेत. अशा प्रकारचे लोक बलात्कार करणाऱ्या नराधमांना पाठिंबा देऊन आपले पोट भरण्याचे काम करतात”, असे सडेतोड उत्तर निर्भयाच्या आईने इंदिरा यांना दिले आहे.
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने याबाबत डेथ वॉरंटही जारी केले आहे. याआधी या आरोपींना 22 जानेवारीला फाशी देण्यात येणार होती. मात्र, आरोपींनी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केल्याने पुन्हा फेरविचार करण्यात काही काळ लोटला. पण पली न्यायव्यवस्था त्यांच्या निर्णयावर ठाम आहे आणि अखेर राष्ट्रपतींनी ती याचिका फेटाळून नराधमांच्या डेथ वॉरंटची तारीख १ फेब्रुवारी हीच निश्चित केली आहे.
आणि आरोपीची फाशी जन्मठेपेत बदलली
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा ,सुनावली होती. मात्र, सोनिया गांधींनी त्या आरोपीला माफ करत त्याच्या फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत झाले होते. गेल्या 26 वर्षांपासून आरोपी जेलमध्ये कैद आहे तर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा 2008 साली आरोपीला भेटायला जेलमध्ये गेल्या होत्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.