HW News Marathi
देश / विदेश

तब्बल १४ दिवसांनंतर जम्मू-काश्मीरमधील शाळा सुरू

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील कमल ३७० हरवण्यात आल्यापासून खबरदारीचा उपाच म्हणून राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. यानंतर तब्बल १४ दिवसांनंतर आज (१९ ऑगस्ट) शाळा उघडणार आहेत. काश्मीरमधील १९० शाळा खुल्या होणार आहेत. तर परिस्थिती आणखी निवळल्यानंतर माध्यामिक आणखी काही शाळा उडण्यात येणार आहे.

जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी रविवारी (१८ ऑगस्ट) सांगितले की, ”सध्या केवळ श्रीनगरमधील प्राथमिक शाळा सुरू करण्यात येणार असून त्यात लासजान, सांगरी, पंथचौक, नौगाम, राजबाग, जवाहरनगर, गगरीबाल, धारा, थीड, बाटमालू आणि शाल्टेंग येथील शाळाचा समावेश आहे. तसेच परिस्थिती सुधारल्यावर अन्य विभागातील देखील शाळा उघडल्या जातील.” दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील दैनंदिन व्यवहारांवरील शिथील करण्यात आलेल्या निर्बंधांवरील सूट कायम राहणार आहे.

कंसल म्हणाले की ‘श्रीनगरचे उपायुक्त शाहीद इकबाल चौधरी यांनी शनिवारी (१७ ऑगस्ट) शिक्षण विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यात शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे आमचे प्राधान्य आहे.’ यापूर्वी रविवारी खोऱ्यात १० आणखी टेलिफोन एक्स्चेंजनी काम करणे सुरू केले आहे. एकूण १७ एक्स्चेंजची सेवा यापूर्वी थांबवली होती. खोऱ्यातील ५० हजार टेलिफोन फिक्स्ड लाइनपैकी २८,००० सुरू झाल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१५ ऑगस्टपर्यंत दिल्ली सोडू नका, मोदींच्या नव्या मंत्र्यांना कोणत्या या सुचना?

News Desk

संघ तोगडियावर कारवाई करणार

swarit

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, ३० हून अधिक नागरिक बेपत्ता

News Desk