HW News Marathi
देश / विदेश

बहुमत सिद्ध करायला मी तयार | कुमारस्वामी

बंगळुरू | कर्नाटकातील हाय व्होल्टेज ड्रामाने अजून एक वेगळे वळण घेतले आहे. कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर मंगळवारी (१६ जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येईल, असे आदेश विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी दिला आहे. यामुळे कर्नाटकातील राजकीय स्थिती पुढील चार दिवस जैसे थे राहणार आहे.

“या राजकीय उलथापालथेमुळे आपण राजीनामा देणार नसल्याचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे. पुढे कुमारस्वामी असे देखील म्हणाले की, आम्ही बहुमत सिद्ध करण्यासाठी तयार असल्याचा दावा केला आहे. यासाठी विधानसभा अध्यक्षांनी तारीख निश्चित करावी, “असेही त्यांनी म्हटले आहे.

विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी घटनेतील कलम ३२ नुसार बंडखोर आमदारांच्या याचिकांबाबतचा मुद्दा उपस्थित केला आहे. आमदारांच्या राजीनाम्याबाबत विचार करण्यापूर्वी त्यांच्या पात्रतेबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे वरिष्ठ अधिवक्ते मुकुल रोहतगी यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजनाथ सिंहांनी केली राफेलची पूजा, भारतीय वायू दलाच्या ताफ्यात

News Desk

संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्याने आदित्यनाथ यांचे उदयनराजेंनी मानले आभार

News Desk

चारा घोटाळ्याचा कट रचल्याचा चालणार लालू यादव यांच्यावर खटला

News Desk