मुंबई | नोटबंदीच्या निर्णयाबाबत माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी नोटबंदीबाबत मोदी सरकारला फटकारले असतानाच माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनीसुद्धा नोटाबंदीच्या निर्णयावर बोट ठेवले आहे. नोटाबंदीमुळे निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर थांबला नाही. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी निवडणुकीत अधिक काळे धन जप्त करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
Former Chief Election Commissioner OP Rawat: After demonestisation it was thought that misuse of money during election will be brought down. But it couldn't be proved on basis of the data of the seizures.Compared to previous elections, there were more seizures in the same states. pic.twitter.com/mJ6RfivOgx
— ANI (@ANI) December 3, 2018
ओ. पी. रावत हे नुकतेच मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी निवडणुकीत होणाऱ्या काळ्या पैशांच्या वापरावर चिंता व्यक्त केली आहे. “नोटबंदी झाल्यानंतर निवडणुकीत पैशाचा गैरवापर कमी केला जाईल”, असे सांगितले गेले होते. मात्र, निवडणुकांवेळी जप्त केलेल्या काळ्या पैशांचा आकडा पाहता हा दावा योग्य ठरू शकत नाही. राजकीय वर्ग आणि त्यांच्या वित्त पुरवठादारांकडे पैशाची कमतरता नाही. निवडणुकांमध्ये काळ्या पैशांचा वापर होणे ही चिंतेची बाब आहे. अशा प्रकारे वापरलेले पैसे सामान्यतः काळे असतात. निवडणुकीत काळा पैसा वापरला जातो, असेही ते म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.