HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधींनी दिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अशा शुभेच्छा

मुंबई | जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने देशातील सर्वसामान्यापासून ते राजकारणी, कलाकार आणि तिन्ही दलातील जवांनानी योगासने करून हा दिवस साजरा केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी योगा दिनावरून त्यांच्या ट्वीटर हँडलवरून एक पोस्ट शेअर करत लष्करातील जवानांची खिल्ली उडवली आहे.

राहुल गांधी यांनी लष्कराच्या श्वान पथकातील श्वानांचा व जवानांचा एकत्रित योग करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या फोटोला राहुल यांनी नवीन इंडिया अशी कॅप्शन दिली आहे. राहुल यांनी दिलेल्या कॅप्शन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नया भारत’ या घोषणेची खिल्ली उडवली आहे. यानंतर सोशल मीडियामध्ये राहुल गांधींना नेटकऱ्यांनी देखील त्यांना खडेबोल सुनावले आहे.

राहुल गांधींच्या या ट्विटवरून ट्विटवर रणकंदन माजले आहे. यात भाजपचे खासदार तेजस्वी सुर्या भडकले असून त्यांनी राहुल गांधीला चांगलेच फटकारले आहे. सुर्या यांनी ट्विट करून म्हटले की, “भारतीय लष्करातील शूर जवानांचा, लष्कराच्या श्वान पथकाचा, योगा परंपरेचा आणि देशाचा अपमान केला आहे. देशातील काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांचे फार वाईट वाटते की, त्यांना राहुल गांधीसारखा नेता मिळाला आहे,”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील ‘हे’ राज्य येत्या ७ एप्रिलपर्यंत होणार ‘कोरोना’मुक्त

swarit

“कोरोना वायरस म्हणून अपमान केलेल्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा!”

News Desk

भारतीय लष्कर भरतीला काश्मिरी तरुणांचा लक्षणीय प्रतिसाद

News Desk