नवी दिल्ली | माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे मंगळवारी (२९ जानेवारी) दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात निधन झाले. फर्नांडिस ८८ वर्षांचे होते. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जॉर्ज फर्नांडिस हे भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनानंतर अनेक दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली आहे.
Union Minister Nitin Gadkari on #GeorgeFernandes: I offer condolences at his passing away. He committed his life to the country. He fought for justice for trade unions. I considered him an icon. pic.twitter.com/gf42Kxg1Yj
— ANI (@ANI) January 29, 2019
जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुःख व्यक्त केले. “जॉर्ज फर्नांडिस यांनी देशासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. व्यापारी संघटनांच्या न्यायासाठी, हक्कांसाठी ते लढले. मी त्यांना आदर्श मानतो,” असे नितीन गडकरी म्हणाले.
Rajnath Singh: #GeorgeFernandes ji served the nation in several capacities &held key portfolios like Defence&Railways at different times. He led many labour movements&fought against the injustice towards them. His tenure as Def Minister was outstanding.May his soul rest in peace. pic.twitter.com/ucM9S6rrpH
— ANI (@ANI) January 29, 2019
“जॉर्ज फर्नांडिस यांनी देशाची सेवा केली. वेगवेगळ्या काळात संरक्षण आणि रेल्वेसारख्या महत्त्वाच्या खात्यात त्यांनी काम केले. त्यांनी अनेक कामगार चालवली केल्या आणि कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा दिला. देशाचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ उत्कृष्ट होता. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो”, अशी भावना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली.
During his long years in public life, George Sahab never deviated from his political ideology. He resisted the Emergency tooth and nail. His simplicity and humility were noteworthy. My thoughts are with his family, friends and lakhs of people grieving. May his soul rest in peace.
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2019
“एवढ्या प्रदीर्घ काळाच्या राजकीय प्रवासात जॉर्ज साहेबांनी कधीही त्यांच्या राजकीय विचारधारेपासून फारकत घेतली नाही. देशावर लादण्यात आलेल्या आणीबाणीचा त्यांनी जोरदार विरोध केला. त्यांचा साधेपणा आणि त्यांची नम्रता लक्षणीय होती. त्यांचे कुटुंबीय, मित्र-परिवार यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो”, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
रक्षा मंत्री के रूप में तथा अनेक क्षेत्रों में भारत की सेवा करने वाले श्री जॉर्ज फर्नांडीस के निधन के बारे में जानकर दुःख हुआ। वे ‘सादा जीवन, उच्च विचार’ के आदर्श का उदाहरण थे। आपातकाल और उसके बाद भी, वे लोकतंत्र के सेनानी रहे। हम सभी को उनकी कमी महसूस होगी – राष्ट्रपति कोविन्द
— President of India (@rashtrapatibhvn) January 29, 2019
“संरक्षण मंत्री पदासह अन्य अनेक क्षेत्रात भारताची सेवा करणारे जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाच्या बातमीने मला दुःख झाले आहे. ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ याचे ते आदर्श उदाहरण होते. आणीबाणी आणि त्या नंतरच्या काळातही ते लोकशाहीच्या मूल्यांकरिता लढले. आम्हाला त्यांची उणीव जाणवत राहील”, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.