HW Marathi
देश / विदेश

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, ३ नागरिकांचा मृत्यू

श्रीनगर | शांततेचा संदेश देण्याची भाषा करणारा पाकिस्तानच्या कुरघोड्या थांबण्याचे नाव घेत नसून अद्यापही वारंवार सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करतच आहे. जम्मू-काश्मीरमधील मेंढर, उरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी रेंजर्स आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली. पुंछ जिल्ह्यात सलोत्रीमध्ये झालेल्या या गोळीबारात एकाच कुटुंबातील ३ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले असून २ जण जखमी आहेत. “पाकिस्तानी रेंजर्स आता सामान्य नागरिकांना लक्ष्य करीत आहेत. पाकिस्तानकडून ग्रेनेड आणि मोर्टारने हल्ला केला जात आहे”, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने भारतीय जवानांवर केलेल्या भीषण हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पाकिस्तानला मोठा दबाव सहन करावा लागत आहे. मात्र, पाकिस्तानकडून भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना शुक्रवारी (१ मार्च) सुखरूप मायदेशी पाठविल्यानंतर भारताकडून समाधान व्यक्त होत होते. मात्र, त्याच दिवशी संध्याकाळी ६ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याकडून हंदवाड्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. या चकमकीत भारतीय सैन्याचे ५ जवान शहीद झाला असून ४ जवान जखमी आहेत. जखमी जवानांवर सध्या उपचार आहे.

Related posts

भारतीय सैन्याकडून पाक विरोधात मोठी कारवाई

News Desk

काश्मीरमध्ये निपाणीचा जवान शहीद

News Desk

मल्ल्याच्या प्रत्यार्पण आदेशावर स्वाक्षरी झाली, मात्र ‘ही’ आहे अडचण

News Desk