HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. यात १५ उमेदवारांच्या जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील अमेठीतून तर सोनिया गांधी या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

रायबरेली आणि अमेठी हे मतदारसंघ नेहमीच काँग्रेसचे गड मानले गेले आहेत. राहुल गांधी यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक अमेठी या त्यांच्या बालेकिल्ल्यातून लढविली होती. मात्र तेथे भाजपाच्या स्मृती इराणी यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली होती. काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेल्या १५ जागांपैकी ११ जागा उत्तर प्रदेशातील तर चार जागा गुजरातमधील आहेत.

 

ही आहे काँग्रेसच्या 15 उमेदवारांची पहिली यादी

सोनिया गांधी – रायबरेली, उत्तर प्रदेश

राहुल गांधी – अमेठी, उत्तर प्रदेश

इम्रान मसूद – सहारनपुर, उत्तर प्रदेश

सलीम इकबाल शेरवानी – बदायूं, उत्तर प्रदेश

जितिन प्रसाद – धौरहरा, उत्तर प्रदेश

अन्नू टंडन – उन्नाव, उत्तर प्रदेश

सलमान खुर्शीद – फर्रुखाबाद, उत्तर प्रदेश

राजाराम पाल – अकबरपूर, उत्तर प्रदेश

ब्रिज लाल खबरी- जालौन, उत्तर प्रदेश

निर्मल खत्री – फैजाबाद, उत्तर प्रदेश

आर.पी. एन. सिंग – कुशी नगर, उत्तर प्रदेश

राजू परमार – पश्चिम अहमदाबाद, गुजरात

भारतसिंह सोलंकी – आनंद, गुजरात

प्रशांत पटेल – वडोदरा, गुजरात

रणजीत मोहनसिंग रतवा – छोटा उदयपूर, गुजरात

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगातील १०० टॉप ब्रॅण्ड्समध्ये टाटा समूह ठरला एकमेव भारतीय ब्रँड

News Desk

राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव सांगा, मग चर्चा – काँग्रेस

News Desk

झारखंडमध्येही आता सीबीआयला चौकशीसीठी निर्बंध

News Desk