HW Marathi
देश / विदेश

एअर इंडियाच्या विमानातील क्रू मेंबर्सना ‘जय हिंद’ बोलणे बंधनकारक

नवी दिल्ली | एअर इंडियाच्या सर्व विमानांमधील क्रू मेंबर्सना प्रत्येक उड्डाणाच्या घोषणेनंतर ‘जय हिंद’ची घोषणा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाची तातडीने अंमलबजाणी करण्यात येणार आहे. जय हिंद बोलण्यात येणार असल्याची माहिती एअर इंडियाचे संचालक (ऑपरेशन्स) अमिताभ सिंग यांनी दिली आहे.

याआधी  देखील एअर इंडियाचे तत्कालीन चेअरमन अश्वनी लोहानी यांनी मे २०१६ मध्ये आपल्या वैमानिकांना ‘जय हिंद’ बोलण्याच्या सूचना दिल्या होत्या. एअर इंडियातील केबिन क्रू आणि कॉकपिट क्रू प्रत्येक उड्डाणाच्या घोषणेनंतर ‘जय हिंद’ बोलणार आहेत. गेल्‍या काही दिवसात भारत आणि पाकिस्‍तानमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. त्‍या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे.

 

Related posts

चहा, नाष्टा देत नाही म्हणून पत्नीला तलाक

News Desk

ती सेक्स सीडी बनावट, हार्दिकचे भाजपवर आरोप

News Desk

कश्मीरमध्ये भाजपच्या सचिवाची गोळ्या झाडून हत्या

अपर्णा गोतपागर