HW News Marathi
देश / विदेश

#AirStrike : भारतीय वायू दलाच्या कारवाईला परराष्ट्र मंत्रालयाचा दुजोरा

नवी दिल्ली | भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून अखेर भारतीय वायू दलाच्या एअर स्ट्राईकच्या कारवाईला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी या कारवाईला अधिकृत दुजोरा दिला आहे. भारतीय वायू दलाच्या ‘मिराज २०००’ या १२ लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये (एलओसी) असणाऱ्या दहशवाद्यांच्या तळावर मंगळवारी (२६ नोव्हेंबर) पहाटे ३.३० च्या सुमारास तब्बल १००० किलो बॉम्ब टाकले असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. भारतीय सैन्याकडून अवघ्या २० मिनिटांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून देखील आता या कारवाईला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • भारतीय वायू सेनेचा कारवाईला अधिकृत दुजोरा
  • बालाकोटमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ला
  • मौलाना युसूफ अझर हे दहशतवादी प्रशिक्षण तळ चालवत होता
  • युसूफ अझर हा मसूद अझरचा नातेवाईक
  • आत्मघातकी दहशतवादी, अनेक अतिरेकी, प्रशिक्षकांची खात्मा
  • सामान्य जनतेला या कारवाईचा त्रास होऊ दिला नाही
  • जैश-ए-मोहम्मदने आजपर्यंत अनेक हल्ले केले
  • पाकिस्तानला वारंवार पुरावे देऊनही त्यांनी जबाबदारी झटकली
  • जैश-ए-मोहम्मद आणखी काही हल्ले करण्याचा तयारीत होते
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने एम्पिरिकल डेटा द्यावा; सुप्रिया सुळेंची मागणी

News Desk

हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश

News Desk

“महाराष्ट्र भाजपाने फक्त एवढंच स्पष्ट करावं की….”- संजय राऊत

News Desk