हैदराबाद | काँग्रेस आता संपली असून ज्यांनी काँग्रेसमध्ये आयुष्याची ५० वर्षे घालवली ते देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन आपले डोके टेकवत आहे, अशा शब्दात एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवर टीका केली. ओवेसी यांनी हैदराबाद मधील एका जाहीर सभेत काँग्रेसवर निशाणा साधला.
#WATCH: At an event in Hyderabad, yesterday, AIMIM Chief Asaduddin Owaisi said, 'Congress is finished. A man who spent 50 years in Congress & was President of India visited RSS headquarters. Do you still have hopes from this party?' pic.twitter.com/3qV12JvieO
— ANI (@ANI) June 9, 2018
तसेच आता काँग्रेसकडून कोणतीच अपेक्षा राहिली नसल्याचे देखील यावेळी ओवेसी बोलत होते. तर पुढे असे देखील म्हटले की, या पक्षाकडून तुम्हाला अजूनही अपेक्षा आहेत का? असा सवाल देखील ओवेसी यांनी या सभेत उपस्थित केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.