HW News Marathi
देश / विदेश

अखिलेश यादवकडून शहीद पत्नीऐवजी भलतीचाच सत्कार

आझमगढ : १९६५च्या भारत- पाक युद्धात गाजविलेल्या भीम पराक्रमाबाबत मरोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलेल्या शहीद अब्दुल हमीद यांच्या पत्नी म्हणून भलत्याच स्त्रीचा सत्कार करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गेल्या बुधवारी येथे झालेल्या कार्यक्रमात दाखविलेल्या बेजबाबदारपणामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

समाजवादी पक्षाने आझमगढ जिल्ह्यातील शहीद कुटुंबियांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्या वेळी अखिलेश यादव यांनी शहीद अब्दुल हमीद यांच्या विधवा पत्नी रसूलन बी यांचाही सत्कार केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. मात्र, माझा कोणी सत्कार केला नाही. मी घराच्या बाहेरही पडले नाही, असे ९५ वर्षांच्या रसूलन बी यांनी सांगितल्याने अखिलेश यांच्या हस्ते सत्कार झाला ती स्त्री कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्कार समारंभाच्या छायाचित्रात अखिलेश यांच्यासोबत व्यासपीठावर दिसणारी स्त्री माझी आजी नाही, असे रसूलन बी यांच्या नातवानेही स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

1993 स्फोट; अबू सालेम,करिमुल्लाला जन्मठेप, दोन लाख दंड ; ताहिर, फिरोजला फाशी

News Desk

२५ ऑगस्टला मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार?

News Desk

‘येस बँके’वर आरबीआयचे निर्बंध, ग्राहकांना आता फक्त ५० हजार येणार काढता

swarit