HW News Marathi
देश / विदेश

अलास्कात ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

नवी दिल्ली | अलास्काच्या दक्षिणेकडे असणाऱ्या केनाई उपद्वीपाला ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी या परिसरातील तब्बल १० हजारहून अधिक नागरिकांना या भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपामुळे परिसरातील अनेक इमारती आणि पूल कोसळले असून रस्त्यांनाही तडे गेले आहेत.

अलास्कामध्ये झालेल्या या ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर ‘नॅशनल ओशियनिक अॅण्ड अॅटमोस्फियरिक एडमिनिस्ट्रेशन’ कडून त्सुनामीचा इशारा देखील देण्यात आला होता. मात्र, उत्तर अमेरिकेतील कॅनेडियन क्षेत्राच्या मूल्यांकनानंतर दिला गेलेला हा त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला आहे. दरम्यान, अँकरेज या शहराच्या उत्तरेला ७ मैलावर भूकंपाचे केंद्र होते. अँकरेज शहर आणि परिसरात सुमारे ४ लाख नागरिक राहतात अशी माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता तुम्ही ड्रोन उडवू शकता… पण या आहेत अटी

News Desk

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा शेअर बाजारावर परिणाम

News Desk

नेटीझन्सकडून भारतीय वायू सेनेचे अभिनंदन, सोशल मीडियावर ‘Air Strike’ ट्रेंडिंग

News Desk