नवी दिल्ली | कर्नाटकमधील राजकीय वातावरण आता संपूर्णपणे ढवळून निघाले आहे. कर्नाटकमधील काँग्रेस- जेडीएस सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्वच्या सर्व २१ मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता या संपूर्ण परिस्थितीची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कर्नाटक भाजपकडून जोर धरत आहे. यापूर्वी शनिवारी (६ जुलै) कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आघाडीच्या १३ आमदारांनी आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत. कर्नाटकचे राज्यपाल १७ जुलै रोजी विधानसभेत बहुमत सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Karnataka Congress Legislature Party leader Siddaramaiah corrects himself; says, "21 Karnataka Congress ministers have resigned voluntarily" https://t.co/vXrXlaWU51
— ANI (@ANI) July 8, 2019
कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांची संख्या सातत्याने घटत आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण २२४ जागा आहेत. बहुमतासाठी ११३ आमदारांची आवश्यकता आहे. काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षांसह एकूण ८० आमदार आहेत. तर जेडीएसकडे ३७ आमदार आहेत. दोन्ही मिळून ११७ आमदारांच्या संख्याबळावर जेडीएस-काँग्रेस सत्तेत आले होते. तसेच बहुजन समाज पार्टी आणि एका अपक्ष आमदारानेदेखील या सरकारला पाठिंबा दिला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.