HW News Marathi
Covid-19

१८ मेपासून तमिळनाडूतील सरकारी कार्यालये सुरु होणार

तमिळनाडू | सध्या देशात तिसरा लॉकडाऊन सुरु आहे. हा लॉकडाऊन १७ मेला संपणार असून पुन्हा चौथा लॉकडाऊन १८ मेपासून सुरु होणार असल्याची माहिती पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी दिली होती. दरम्यान, काही ठिकाणी लॉकडाऊनचे नियम हे शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे.

तमिळनाडूमध्येही येत्या १८ मेपासून सरकारी कार्यालये सुरु होणार आहेत. कार्यालयामध्ये ५० टक्के कर्मचारी हजर असतील, आणि या सगळ्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतच कार्यालय सुरु राहील असेही परिपत्रकात म्हटले आहे. तसेच, कार्यालयाची वेळ नेहमीप्रमाणेच असेल आणि आठवड्यातून ६ दिवस कार्यालायांचे कामकाज सुरु राहणार आहे. तसेच, शनिवारीही कामकाज सुरु असणार आहे.

तसेच, कर्मचाऱ्यांची २ गटात विभागणी करण्यात आली आहे. एक गट सोमवार-मंगळवार काम करणार तर दुसरा गट बुधवार-गुरुवार, अशा पद्दधतीने आलटूनपालटून काम करणार आहेत. सर्व प्रकारची काळजी घेत आता पुन्हा सर्व रुळावर आणण्याचा प्रयत्न तमिळनाडू सरकार करणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनंत चतुर्दशीला पुणे बंद! फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार…

News Desk

देशात येत्या ६ ते ८ आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य शिवसेना खासदार राहुल शेवाळे मानखुर्दमध्ये राबवणार ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियान’

News Desk