HW Marathi
देश / विदेश

आलोक वर्मांना सीबीआयच्या संचालकपदावरून पुन्हा हटविले

नवी दिल्ली | आलोक वर्मा यांना पुन्हा एकदा सीबीआयच्या संचालक पदावरून हटविण्यात आले आहे. सिलेक्ट कमिटीच्या आज (१० जानेवारी) झालेल्या या  बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ही बैठक तब्बल दोन तास चालली होती. यानंतर वर्मा यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सिलेक्ट कमिटमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सुचविलेले न्यायाधीश ए. के सिकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष नेते मलिक्कार्जुन खरगे  यांचा समावेश होता. वर्मा यांना हटविण्याचा हा निर्णय २-१ अशा बहुमताने घेण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने वर्मा यांना मंगळवारी(८ जानेवारी) सक्तीच्या रजेवरून पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. वर्मा यांना  ज्याप्रकारे सीव्हीसीने (केंद्रीय दक्षता आयोग) सीबीआयच्या संचालक पदावरून हटविले, ते संविधानाच्या विरुद्ध आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश रद्द केले होते. वर्मा यांनी आजच सायंकाळी  सीबीआयचे  सह संचालक अजय भटनागर, डीआयजी एम के सिन्हा, तरुण गौबा, मुरमगेसन आणि अतिरिक्त संचालक ए. के. शर्मा या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुन्हा जुन्या पदावर बदल्या केल्या होत्या. त्यामुळे वर्मा कामावर रुजू झाल्यानंतर बदल्यांचे सत्र त्यांना भोवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

Related posts

शोपियानमध्ये ५ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

देशातील स्वच्छतेच्या कामासाठी मी कायम तुमच्यासोबत !

News Desk

आपचे २० आमदार राष्ट्रपतीकडून अपत्रा

Ramdas Pandewad