HW Marathi
देश / विदेश राजकारण

राज्यसभा खासदार आणि माजी सपा नेते अमर सिंह यांचे निधन 

नवी दिल्ली | माजी सपा नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरु होते. उत्तर प्रदेशातल्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होत होती. जुलै २०१६ मध्ये ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले. तेव्हापासून ते राजकारणात जास्त सक्रिय नव्हते. या वर्षी त्यांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशनही करण्यात आले होते. प्रदीर्घ आजारामुळे त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

अमर सिंह हे उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले होते. समाजवादी पक्षापासून फारकत घेतल्यानंतर ते राजकारणात काहीसे कमी सक्रिय होते. गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ ते आजारी होते. १९९६ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेल्यापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती.

Related posts

पाकिस्तानकडून दिल्ली ते लाहोर बससेवा देखील स्थगित

News Desk

सीआरपीएफ’च्या पथकावर दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद

News Desk

‘कोरोना’चा फटका आयपीएलला बसणार?

rasika shinde