HW News Marathi
देश / विदेश

#Oscars2022 : पत्नीवर केलेल्या ‘जोक’वर स्मिथने थेट सूत्रसंचालकाच्या कानशीलात लगावली, पुरस्कार मिळाल्यानंतर माफीनामा

मुंबई | मनोरंजन विश्वात मानचा मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार २०२२ सोहळा आज पार पडला आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथने सूत्रसंचालन करणाऱ्या ख्रिस रॉक यांच्या कानशीलात लगावली. सूत्रसंचालन करणाऱ्या ख्रिस रॉक यांनी विल स्मिथची पत्नी जॅडा पिंकेट स्मिथवर जोक केला. परंतु, स्मिथला त्यांच्या पत्नीवर केला विनोद फार रुचला नाही. यानंतर स्मिथने थेट स्टेजवर जावून ख्रिस रॉकच्या कानशीलात लगावली. या प्रकारामुळे ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागले. 

 ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात रॉकने G.I Jane २ सिनेमासंदर्भात बोलताना, जॅडा पिंकेट स्मिथच्या डोक्यावर कमी केस असल्यामुळे त्यांना हा सिनेमा मिळाला होता, असी कमेंट केली होती. रॉकला केला जोक स्मिथला फार रुचला नाही. त्यामुळे पुरस्कार सोहळा सुरु असताना थेट स्टेजवर जावून रॉकच्या कानशीलात लगावल. स्मिथची पत्नी जॅडाला अलोपेसिया नावा आजाराने त्रस्त आहे. या आजारात डोक्यावरील केस कमी होतात. यामुळे स्मिथला रॉकचा विदोन फारसा रुचला नाही. त्यामुळे स्मिथने रागाच्या भरात रॉकच्या कानशीलात लागवली.

 

स्मिथने मागतली माफी

कानशील प्रकरणी स्मिथला ‘किंग रिचर्ड’ सिनेमासाठी बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार मिळाला. या सिनेमासाठी स्मिथला पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थितांनी स्टॅडिंग ओवेशन दिले आहे.  यावेळी स्मिथ भावू झाले. माझ्यासोबत नामांकन झालेल्या स्पर्धकांची मी माफी मागतो. मला पुरस्कार मिळाला म्हणून मी रडत नाही. हे क्षण खूप चांगले क्षण असून मी अॅकॅडमीची माफी मागतो. प्रेम हे तुम्हाला वेडे बनविते, असे म्हणत स्मिथने माफी मागितली. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारसाठी काँग्रेस नेते दिल्ली दाखल, पक्षश्रेष्ठींशी करणार चर्चा

News Desk

संजय राऊत आज दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना भेटणार

News Desk

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची घेतली भेट…

News Desk